धक्कादायक! ती हात जोडून विनंती करत होती, मात्र त्यानं ऐकलं नाही, ऑटोचालकाकडून मुलीचा विनयभंग

Khozmaster
2 Min Read

नागपूर: ऑटोचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक ऑटोचालक एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करताना दिसत होता. हा सर्व प्रकार एका महिलेने आपल्या घराच्या खिडकीतून मोबाईलने टिपला. तो व्हिडिओ तिने वस्तीतील नागरिकांचा व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. यानंतर तो सोशल मीडियावर वायरल झाला. अजनी पोलिसांनी वेळीच या वायरल व्हिडिओची दखल घेत ऑटोचालकाला शोधून पोलीस ठाण्यात आणले.

मुलीचे पालक हे सरकारी कर्मचारी आहे. विद्यार्थिनीला शाळेत ये-जा करण्यासाठी एक ऑटो भाड्याने ठेवली आहे. मुलगी सातवीत असताना ऑटोचालक तिला घेऊन जायचा. सध्या मुलगी नववीत असून काही दिवसांपूर्वी शाळेतून घरी आणत असताना चालकाने ओंकारनगर येथील सह्याद्री लॉनच्या मागे ऑटो थांबवला. त्यानंतर विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करू लागला. विद्यार्थिनी त्याला हात जोडून दूर राहण्याची विनंती करत होती. मात्र तरीही तो विद्यार्थिनीवर जबरदस्ती करत होता. दरम्यान एका महिलेने खिडकीतून हे सर्व पाहिले. महिलेने ऑटोचालकाची कृत्ये आपल्या मोबाईलने टिपली.

यानंतर हा व्हिडिओ वस्तीतील नागरिकांना दाखवला. काही वेळाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस कारवाईत आले. या प्रकाराची अजनी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी ऑटो चालकाचा शोध घेण्यासाठी सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी ऑटो चालकाला ताब्यात घेतले. त्याला व्हिडिओ दाखवताच त्याने व्हिडीओतील ऑटोचालक असल्याची कबुली दिली. मात्र विद्यार्थिनी चांगलीच घाबरली असून तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *