आधी मुलांना विष देऊन मारलं, नंतर बिल्डींगवरून उडी मारून आईनेही आयुष्य संपवलं; नाशिकमधील घटनेने खळबळ

Khozmaster
2 Min Read

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एका 30 वर्षांच्या महिलेने तिच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करणआऱ्या या महिलेची दोन मुलदेखील घरात मृतावस्थेत आढळली. या मृत महिलेने आयुष्य  संपवण्यापूर्वी एका व्हिडिओद्वारे मेसेज शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिच्या पतीवर अनेक आरोप करत त्याला दोष दिला होता. आई आणि मुलांच्या या तिहेरी मृत्यूमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेने शहरातील कोणार्क नगर भागात असलेल्या हरिवंदन अपार्टमेंटच्या छतावरून उडी मारली. आत्महत्येपूर्वी या महिलेने तिच्या 8 वर्षांच्या मुलीला आणि 2 वर्षांच्या मुलाला विष पाजले असावे, असा पोलिसांना संशय आहे. ती महिला खाली कोसळल्यानंतर तेथे राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या मृत महिलेच्या घरी पोहोचून तपासणी केली असता घरात तिची दोन मुले मृतावस्थेत आढळून आली. तर मृत महिलेचा पती घराबाहेर होता. पोलिसांनी मृत महिलेने लिहिलेली एक चिठ्ठी जप्त केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे.

आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी या महिलेने एक व्हिडिओ मेसेजही रेकॉर्ड केला. पतीने आपल्याला हे जीवघेणे पाऊल उचलण्यास भाग पाडले, असा आरोप तिने या व्हिडीओमध्ये केला. महिलेने ही क्लिप तिच्या नातेवाईकांसोबत शेअर केली आहे. मृत महिलेचा पती हा कामानिमित्त पुण्यात होता, त्याला तपासात सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

0 8 9 4 7 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *