ऋग्वेदचे तालुक्यात सर्वत्र कौतुक
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा येथील व्यापारी जयप्रकाश कीर्तने यांचा मुलगा प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू या शाळेचा विद्यार्थी ऋग्वेद जयप्रकाश कीर्तने याने सीबीएसई दहावी परीक्षेत ९७ टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
ऋग्वेद हा मंठा येथील व्यापारी जयप्रकाश कीर्तने यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे ऋग्वेद ने वडिलांना मदत करून हे यश संपादन केले आहे. ऋग्वेद च्या वडिलांनी सांगितले की लहानपणापासूनच त्याला अभ्यासाची आवड आहे. व दिवसभर घरी असला की तो अभ्यास करत राहायचा व सर्व शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे.
ऋग्वेद च्या या यशाबद्दल प्रिन्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे बोराडे, माजी आमदार धोंडीराम राठोड आमदार राजेश राठोड व्यापारी भगवान शहाणे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी पत्रकार कृष्णा भावसार रविंद्र भावसार गजानन माळकर वडील जयप्रकाश कीर्तने आई सपना कीर्तने व सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आई – वडील यांच्या आशीर्वादाने आणि शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळाल्याचे ऋग्वेद कीर्तने यांने सांगितले.
Users Today : 17