नाशिक- पुणे महामार्गावर १९ वर्षीय तरूणाची आत्महत्या.

Khozmaster
2 Min Read

नाशिक  नाशिक- पुणे मार्गावरील शिवाजीनगर भागात राहणा-या १९ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सौरव विजय गरड (रा.विजय ममता टॉकीज जवळ पंचशिलनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. सौरव गरड याने रविवारी (दि.१२) आपल्या राहत्या घरात पत्र्यांच्या शेडच्या अ‍ँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

जुगार खेळणा-या दोघांवर पोलीसांची कारवाई
नाशिक  लाखलगाव ता.जि.नाशिक येथील दुध संकल केंद्राजवळ मटका जुगार खेळणा-या दोघांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय जयराम कापसे (रा.कोळीवाडा,लाखलगाव) व अनिल पांडूरंग चोथे (रा.स्पेक्ट्रम हाईटस,मखमलाबादनाका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. याबाबत अंमलदार सचिन बाहिकर यानी फिर्याद दिली आहे. लाखलगाव येथील संजिवणी दुध संकलन केंद्र येथील पत्र्यांच्या शेड जवळ काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार रविवारी (दि.१२) दुपारी पथकाने धाव घेत छापा टाकला असता संशयित अंक अकड्यावर पैसे लावून घेत श्रीदेवी ओपन नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून १ हजार ४५० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार काटकर करीत आहेत.

0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *