Friday, September 13, 2024

दोन दुचाकींची धडक; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

तेल्हारा-हिवरखेड रस्त्यावर बेलखेड येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना रविवार, दि. १९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना उपाचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.

पंचगव्हाण येथील आसीक खान कुदरत खान(४५) हे दुचाकीने पत्नी सुमय्या आशिक खान (३५), मुलगी बुशराह आसीक खान (वय ३), मुलगी अम्मारा आसीक खान (वय ५) आणि मुलगी मरियम आसीक खान (वय ४ महिने) यांना घेऊन तळेगाव बाजार येथून तेल्हाराकडे येत होते. त्याचवेळी आकाश निंबोकार (रा. हिवरखेड, वय ४०) हा तेल्हारा येथून हिवरखेड येथे जात होता. बेलखेडजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये आसीक खान यांच्यासह त्याच्या दोन मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिन्यांची मरियम आशिक खान हिला कुठलीही दुखापत झाली नाही. ती सुरक्षित आहे. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहे. बेलखेड येथील नागरिकांनी व प्रत्यक्षदर्शी यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनला माहिती देऊन रुग्णवाहिकेला पाचारण केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे दाखल केले. या ठिकाणी तिघांना मृत घोषित केल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सुमय्या आशिक खान, आकाश निंबोकार यांना अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. एकाच कुटुंबातील वडील व दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang