Friday, September 13, 2024

क्षुल्लक कारणावरुन मारहाण गुन्हा दाखल

सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील माेठी उमरी परिसरातील रहीवासी युवकास क्षुल्लक कारणावरुन फाेनवरुन शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

तुषार शांताराम मुळक वय ३० वर्षे रा लक्ष्मी नगर मोठी उमरी यांना सुरज कार्लेकर वय ३० वर्ष रा महाकाली मंदिराजवळ मोठी उमरी याने क्षुल्लक कारनावरुन फोनवरून शिवीगाळ केली तसेच जुन्या व्यवहारातील हजार रुपये दे या कारणावरून त्याचे घरासमोर जाऊन शिवीगाळ करीत डाेक्यात वीट मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी सोबत असलेल्या त्याच्या मित्राने तुषार मुळक यांच्या वडीलास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार मुळक यांनी सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्यात दिल्यावरुन पाेलिसांनी आराेपी सुरज कार्लेकर याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ५०७, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang