बुलढाण्यात जिल्ह्यात झाले शुटींग!जिल्ह्यातील कलाकारांना मिळाली संधी
‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटातून मोनालिसा बागल आणि निखिल वैरागर या प्रसिद्ध जोडीसह जिल्ह्यातील अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे प्रमुख कलाकार बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने आयोजित गरबा फेस्टिवल कार्यक्रमा निमित्त शहरात आले होते या वेळी त्यांनी २९ सप्टेंबर २०२२ रोजी पत्रकार परिषद घेऊन चित्रपटातील अनेक.रहस्य सांगितले यावेळी डॉ सुकेशजी झंवर, अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेता निखिल वैरागर, डॉ गणेशकुमार पाटील, भास्कर डाबेराव, आकाश ठाकरे, एड गणेश देशमुख आदीं उपस्थित होते.
या वेळी डॉ सुकेश झंवर म्हणाले की, हा एक उत्तम चित्रपट असुन यातील गाणे अतिशय चांगले आहेत या चित्रपटात बुलढाणा अर्बन कडून शक्य तितकी मदत करण्यात आली असून या मागील. उद्देश फक्त एकच आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील कलाकारांना मिळालेला वाव व जिल्ह्यातील अनेक निसर्ग रम्य सौंदर्य चित्रपटातुन जनते पर्यंत पोहचवणे असा आहे तर मोनालीसा व निखिल म्हणाले की जी भुमिका आम्हाला करायला मिळाल्या. त्याचा आम्हाला आनंद आहे. यातील कथा व गाणी प्रत्येकाच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करतील.
या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव म्हणाले की, ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भागातील आपल्या भाषेतील प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवलेली प्रेमकथा आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. आमच्या या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच दाद देतील.
येत्या १४ ऑक्टोबरला ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपट महाराष्ट्रातील अनेक थिएटर मधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मीती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ.गणेशकुमार पाटील यांची आहे.नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत एन एच स्टुडिओज मुंबई हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
मोनालिसा बागल, निखिल वैरागर या जोडीसोबतच ‘नाळ’ व ‘झुंड’ चित्रपटानंतर एड.गणेश देशमुख हे एका वेगळया भूमिकेत ‘तू फक्त हो म्हण’ मध्ये दिसणार आहेत. सोबत माजी आमदार तुकाराम बीडकर, सविता हांडे, पुष्पा चौधरी, डॉ.गणेशकुमार पाटील, जोया खान, आकाश ठाकरे, रविशंकर शर्मा, भाविका निकम, राम पारस्कर, योगिनी सोळंके,सुरज वाडेकर, परमेश्वर गुट्टे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.तीचे आयटम साँग असणार आहे.
‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाची कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांचे आहेत. सुरेखा गावंडे, भास्कर डाबेराव, स्वप्नील जाधव यांनी गीते लिहिली आहेत. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जय बोरा, पूजा पाटील यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. दिग्दर्शनाची बाजू सांभाळतानाच भास्कर डाबेराव यांनी सुमधूर संगीत चित्रपटाच्या गीतांना दिले आहे. आदित्य बेडेकर यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते रविशंकर शर्मा व राहुल चव्हाण हे आहेत.
तर बुलढाणा अर्बन ने केलेल्या मदतीने व सहकार्याने हा चित्रपट परिपूर्ण तयार झाला आहे,तर या ग्रामीण भागातील कलाकारांच्या मेहनतीला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात दाद द्यावी अशी अपेक्षा डॉ सुकेशजी झंवर यांनी व्यक्त केली.
Users Today : 15