रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं राणेंसमोर आव्हान आहे. नारायण राणेंची विजयाकडे वाटचाल होताच त्यांच्या पत्नी आणि आमदार पुत्र नितेश राणे यांचा विजयोत्सव पाहायला मिळाला.
नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे भाजपच्या मतमोजणी कक्षाकडे जात होत्या. यावेळी गाडीतून उतरलेल्या मातोश्रींना पाहून आमदार नितेश राणेंचा आनंद पोटात मावेनासा झाला. वडिल्यांच्या विजयी आघाडीने भारावलेल्या नितेश राणेंनी आईला उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला.रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना 12 व्या फेरी नंतर 23 हजार 450 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी ही तर सुरुवात आहे, यापुढे कोकणात भाजपा च कमळ, घड्याळ आणि धनुष्य बाण दिसेल असा विश्वास व्यक्त केला.नारायण राणे यांना उमेदवारी उशिरा जाहीर झाली असली, तरी त्यांचं नाव निश्चित मानलं जात होतं. त्यामुळे त्यांनी आधीच मतदारसंघात तळ ठोकत सभा-बैठका, भेटीगाठींचा धडाका लावला होता. महाविकास आघाडीसाठी ही लढाई अस्तित्वाची, तर महायुतीसाठी ती प्रतिष्ठेची ठरली होती.
Users Today : 3