काकाचा खून केल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हे दाखल!२ अटकेत १ फरार

Khozmaster
1 Min Read

वाद विकोपाला गेल्यानंतर जनार्धन तुकाराम जोशी यांच्यावर स्वतःच्या मोठ्या भावाचा मुलगा समाधान उत्तम जोशी याने काकाला ट्रॅक्टरखाली चिरडून जागेवरच मारले व मृतदेह लिंबाच्या झाडाखाली टाकून
पलायन केले. गावकरी या ठिकाणी आले जोशी झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत तर ९० मिटर अंतरावर असलेला त्यांची रुमाल टोपी व खताची खाली बॅग दिसूनआली. यावरुन त्यांचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. घडलेली घटना एवढी भयंकर होती की, पाहणारे सर्वजण हळहळ व्यक्त करीत होते. याबाबत अमडापूर पोस्टेचे ठाणेदार यांनी शिस्तबध्
पध्दतीने हाताळणी केली व आरोपीचा शोध घेणे सुरु केले. हा वाद जुना असल्याने सदर प्रकरण उघडकीस आले. व आरोपी समाधान उत्तम जोशी हा स्वतःहून अटक झाला तर फिर्यादी सुधीर जनार्धन जोशी यांच्या तक्रारीवरुन समाधान उत्तम जोशी, सागर समाधान जोशी, संजय श्रीकृष्ण इंगळे सर्व रा. धोत्राभणगोजी यांच्यावर अप. नं. १६८/२०२४ कलम ३०२, १०९, ५०४, ५०६ भादवि. अन्वये गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास उपविभागीय पो. अधिकारी सुधीर पाटील, सह. पोलिस निरीक्षक सचिन पाटील, पीएसआय धनंजय
इंगळे हे करीत आहेत.

0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *