जालना शिक्षणाधिकारी कार्यालया समोर शिक्षकांचे उपोषण

Khozmaster
2 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद जालना या कार्यालयासमोर दि 7 जून 2024  शुक्रवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमरण उपोषण करत आहे यामध्ये अतिरिक्त शिक्षक बाळासाहेब देविदास लहाने सहशिक्षक श्री विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदईएक्को ता भोकरदन व प्रदीप विश्वनाथ राठोड सहशिक्षक श्री म.स्था.जैन विद्यालय जालना यांचा समावेश आहे.सन 2022 – 23 च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन समुपदेशनाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जालना यांच्याकडून करण्यात आले होते त्यात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने संचमान्यतेत मंजूर पदा एवढेच शिक्षक कार्यरत असतांना देखील सदरील शिक्षकाचे नाव अतिरिक्त शिक्षक म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविले बाळासाहेब देविदास लहाने यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी जालना यांच्याकडे रितसर आक्षेप नोंदविला परंतु त्याचा काही एक विचार न करता त्यांना अतिरिक्त ठरवण्यात आले पण सर्व अतिरिक्त शिक्षकांचे वेतन व्यवस्थितपणे सुरू असतांना केवळ एका शिक्षकाचे वेतन गेल्या चार महिन्यापासून का थांबवण्यात आले ?याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .संच मान्यतेत पद रिक्त असतांना सुद्धा कार्यरत शिक्षकाला अतिरिक्त दाखवून त्याचे वेतन थांबविणे हा त्या शिक्षकाला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे 22 एप्रिल 2024 च्या पत्रानुसार  माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांनी संबंधित मुख्याध्यापकाला त्या अतिरिक्त शिक्षकाचे वेतन काढणे विषयी  आदेशित सुद्धा केले परंतु मुख्याध्यापकांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवली दुसरे असे की प्रदीप विश्वनाथ राठोड हे विनाअनुदानित तत्त्वावर श्री म स्था जैन विद्यालय जालना या शाळेवर कार्यरत आहेत डिसेंबर 2024 पासून संस्थेने त्यांचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण अधिकारी जालना यांच्याकडे विनाअनुदानित तत्वावरून अनुदानीत तत्वावर वैयक्तिक मान्यता मिळण्यासाठी सादर केलेला आहे परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयाकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत सदर शिक्षकांनी शिक्षक उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे वेळोवेळी अर्ज केले असताना सुद्धा काहीही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे नाईलाजाने मराठवाडा शिक्षक संघाच्या पाठिंब्याने आमरण उपोषणास  बसण्याचा सदरील शिक्षकांनी निर्णय घेतला आहे

0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *