वाळू उपलब्ध नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी मातीने घरकुल बांधावे का? – नगरसेविका दवणे यांचा संतप्त सवाल

Khozmaster
2 Min Read
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
प्रतिनिधी- मंठा शहरातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी याकरिता नगरपंचायत कार्यालयासमोर नगरपंचायत प्रशासनाचा निषेध करीत वार्ड क्रमांक 06 च्या विद्यमान नगरसेविका सौ. यमुना शेषनारायण दवणे यांनी बोलताना सांगितले की, मंठा शहरातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी हक्काची वाळू उपलब्ध करून दिली नसल्याने मी नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात नगरपंचायत प्रशासनाचा निषेध करीत असंख्य घरकुल लाभार्थ्यांसोबत हे उपोषण सुरू केले असल्याचे सांगितले.
मंठा शहरातील घरकुल लाभार्थींना आपल्या स्तरावरून ऑफलाइन पद्धतीने वाळू उपलब्ध करून द्यावी राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी व संबंधित वाळू सुद्धा ऑनलाईन पद्धतीने नसून ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध करून द्यावी मंठा शहरातील असंख्य घरकुल लाभार्थ्यांना लाभ घ्यावा असे नगरसेविका यमुना शेषनारायण दवणे यांनी पुढे बोलताना सांगितले.
यावेळी मंठा शहरातील विविध संघटना व असंख्य घरकुल लाभार्थी यांनी या उपोषणास पाठिंबा दिला यामध्ये मंठा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गणेशरावजी शहाणे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, वार्ड क्रमांक सहा मधील विकास प्रिय नगरसेविका सौ यमुना शेषनारायण दवणे या प्रधानमंत्री आवास योजना याप्रसंगी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकरिता मोफत वाळू मिळवण्यासाठी उपोषणास बसले असून माझा या उपोषणास पाठिंबा असल्याचे सांगितले.
यांच्यासह मंठा नगरपंचायत चे नगरसेवक पाणीपुरवठा सभापती उबेद बागवान, नगरसेवक अरुण वाघमारे, उपनगराध्यक्ष जमील कुरेशी, नगरसेवक अजित नाना बोराडे, पत्रकार अनिल खंदारे, शिवसेनेचे कार्यकर्ते नितीन मोरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष अशोकराव खरात, धम्मानंद वाघमारे, दिनेश सराफ राजेभाऊ नरवाडे , गणेश करे , अजिंक्य बोराडे, असंख्य घरकुल लाभार्थी या उपोषणास जाहीरपणे पाठिंबा देत समर्थन केले.
0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *