शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर गजाआड

KHOZ MASTER
1 Min Read
कवठे येमाई दि. १० (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – शिरूर शहरातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून तिघा चोरट्यांनी दि.२० एप्रिल रोजी सुमारे दोन लाख रुपयांची रोकड व पद्मावती देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. अनेक ठिकाणी या आरोपींनी चोऱ्या केल्या होत्या. या तीघांना गजाआड करून पोलिसांनी त्यांची रवानगी तळोजा कारागृहामध्ये केली होती.
दरम्यान, शिरूर मधील जैन मंदिरातील चोरीप्रकरणी अधिक तपासाकामी या तिघांना नुकतेच शिरूर ला आणण्यात आले होते. शिरूरमधील तपासानंतर दि. ०५ रोजी त्यांना पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांच्या पथकासह पुन्हा तळोजा कारागृहामध्ये नेले जात असताना कारागृहापासून काही अंतरावर मुजाहीद गुलजार खान (रा. कारेगाव, ता. शिरूर) याने लघुशंकेचा बहाणा करून वाहन थांबविण्यास भाग पाडले व आडोशाला जाताच पोलिसांना हिसका मारून पळून गेला होता.
त्यानंतर शिरूर पोलिसांसह, क्राईम ब्रँच, तेथील स्थानिक पथक त्याचा शोध घेत होते.दोन दिवस रात्रंदिवस अथक परिश्रम घेत बेलापूर पंचशील  परिसरात त्याचा मागोवा घेत या अट्टल गुन्हेगाराला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६
0 9 7 3 5 3
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *