गरज सरो अन् वैद्य मरो! मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण नाही, मनसेत नाराजी

KHOZ MASTER
2 Min Read

मुंबई : नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा भव्य सोहळा पार पडला. या सोहळ्यात एनडीएतील सर्वच घटकपक्षांचे बडे नेते सहभागी झाले होते. मात्र नरेंद्र मोदींच्या शपथविधीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. शपथविधी सोहळ्याचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण होतं की नाही, असा संभ्रम अनेकांच्या मनात होता. मात्र आमंत्रणच मिळालं नसल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याने पक्षातील नेते-पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आणि दोन दिवसात होणाऱ्या मनसेच्या बैठकीत यावरुन नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे.खरं तर मनसे ही अधिकृतरित्या एनडीएचा भाग नाही, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. इतकंच नाही, तर ठाणे, पुणे, कल्याण आणि रत्नागिरी या मतदारसंघात राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. या चारही मतदारसंघातील उमेदवार निवडून आल्याने मनसेने आपला स्ट्राईक रेट १०० टक्के असल्याचंही म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत घेतलेल्या सभेसाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कचं मैदान बूक केलं होतं.महत्त्वाचं म्हणजे, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेवरील कोकण पदवीधर मतदारसंघात राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना मैदानात उतरवलं होतं. परंतु भाजपच्या आग्रहानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यांच्यावर यूटर्नचा ठपका पुन्हा लागला. या सगळ्या वातावरणात सन्मान होत नसल्याची भावना बळावली.मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण गेलं नव्हतं, म्हणून मनसेत प्रचंड नाराजी आहे. गरज सरो अन् वैद्य मरो अशी भावना नेते-पदाधिकाऱ्यांत बळावली आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम केलं असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे.

0 9 7 3 5 3
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *