कवठे येमाई दि. १२ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने व पेरणी योग्य पाऊस झालयाने बळीराजा सुखावला असून आता खरीपातील शेती मशागतीस होणार सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संधान पाहावयास मिळत आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील टाकळी हाजी,माळवाडी, म्हसे, आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, जांबुत, वडनेर, पिंपरखेड, काठापुर, फाकटे, निमगाव दुडे, रावडेवाडी, चांडोह, सविंदणे, शरद वाडी या परिसरात मागील दोन दिवसांबरोबर काल मंगळवारी देखील जोरदार पाऊस झाला.
शेतातील उन्हाळी पिके पाण्याअभावी धोक्यात असताना कुकडी नदीला पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. सलग तीन दिवस समाधानकारक पाऊस झाल्याने तूर्तास तरी जमिनीची तहान भागली असून जनावरांचा चारा आणि पिके तरारणार आहेत. या पावसाने विहिरी आणि कूपनलिकांची पाण्याची पातळी वाढू शकते असा अंदाज शेतकरी साहेबराव लोखंडे,जयकुमार मोटे,किरण तांबे यांनी व्यक्त केला आहे.
पावसामुळे काढणीला आलेले डाळिंब पिकाची मात्र शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार असून पाऊस पडल्यानंतर बुरशी, किड रोग निवारणासाठी लगेचच औषधांची फवारणी करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्याने वैतागलेले नागरीक सध्या पडत असलेल्या पावसाच्या वर्षावाने काहीसे सुखावले आहेत. आज ही दुपारपर्यंत प्रचंड उष्मा जाणवत असून दुपारनंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

– सुभाष शेटे,९९७५६७४२८६
Users Today : 39