Thursday, July 25, 2024

सावधान! ‘फॅटी लिव्हर’ने वाढतोय ह्रदयविकाराचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, जाणून घ्या कारणे, लक्षणे, उपाय…

पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या विविध समस्या वाढत असतानाच आता ‘फॅटी लिव्हर’चा धोका वाढला आहे. लठ्ठ व्यक्तींबरोबर सडपातळ व्यक्तींना ‘फॅटी लिव्हर’चा सामना करावा लागत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब, योग्य वेळेत तपासणी न करणे या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत ‘फॅटी लिव्हर’च्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

‘फॅटी लिव्हर’विषयी जनजागृती व्हावी, म्हणून दर वर्षी १३ जून रोजी ‘फॅटी लिव्हर’ दिन साजरा केला जातो. रूबी हॉल क्लिनिकतर्फे ‘फॅटी लिव्हर’ या आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हॉल क्लिनिकचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. नितीन पै यांनी ही माहिती दिली.‘फॅटी लिव्हर’चे तीन टप्पे असतात. यकृत कडक होण्याची टक्केवारी (केपीए) ७.५च्या आत असेल, तर नॉर्मल समजली जाते. यातील ७.५ व १२च्या दरम्यानची स्थिती व्यायाम व पथ्ये पाळून पूर्ववत होऊ शकते. मात्र, १४च्या पुढील टक्केवारी पूर्ववत होऊ शकत नाही. त्यावर योग्य उपचार न केल्यास पुढील टप्प्यात लिव्हर सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. पूर्वीच्या तुलनेत निदान करणे आता सोपे झाले असून, सोनोग्राफी करूनही या आजाराचे निदान करता येते. फॅटी लिव्हरचे प्रमाण कमी करण्यासाठी वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे; तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे आवश्यक आहे,’ असेही डॉ. पै म्हणाले.यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यास त्याला ‘फॅटी लिव्हर’ म्हणतात. यकृतामध्ये साचलेल्या चरबीचे वजन यकृतापेक्षा पाच टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर त्यालाही ‘फॅटी लिव्हर’ म्हटले जाते. यकृतातील वाढत्या चरबीकडे लक्ष दिले नाही, तर यकृताचा आजार होण्याची शक्यता असते.

आहारातील फॅट्सचे योग्य पद्धतीने विघटन न झाल्यास त्याचे रूपांतर यकृतातील वाढलेल्या चरबीत होते. आहारात अतिप्रमाणात साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणे. त्या तुलनेत कमी व्यायाम करणे; तसेच स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड या कारणांमुळे यकृतातील चरबी वाढते.
- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang