मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. अखेर हा चित्रपट आज शुक्रवारी १४ जूनला प्रदर्शित होत आहे.
या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. संघर्षयोद्धा सिनेमाच्या सुरभी हांडे, मोहन जोशी, सागर कारंडे असे मराठीतील चेहरे दिसले होते. आता या सिनेमात आणखी दोन नव्या पात्रांची एन्ट्री झाल्याचं दिसत आहे.
नुकताच ‘संघर्षयोद्धा’ सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची पात्रही दिसत आहे. सुरुवातीपासूनच यांच्या भूमिका कोण साकारणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता यावरुन पडदा हटवण्यात आला आहे. या सिनेमात छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.
Users Today : 19