छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. सध्या या मालिकेत अर्जुन आणि अपर्णा यांच्या नात्यात अनेक चढउतार येत असल्याचं दिसून येत आहे.
यामध्येच आता अर्जुनला त्याचा मुलगा कोण आहे हे कळणार आहे.
अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी सिंबा कसोशीने प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे अपर्णा ड्रग्स माफीयांवर कारवाई करत आहे. ज्यामुळे तिची वरचेवर अर्जुनसोबत भेट होत आहे. परंतु, त्यांच्यातील दुरावा स्पष्टपणे दिसून येत आहे. यामध्येच आता अमोल किडनॅप होणार आहे. ज्यामुळे या मालिकेला पुन्हा एक वळण मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
वज्र प्रोडक्शनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिप्यासोबत असतांना सिंबाला कोणीतरी किडनॅप करतं. त्यामुळे घाबरलेला दिप्या, अप्पी आणि अर्जुनला या गोष्टीची कल्पना देतो. त्यानंतर अर्जुन आणि अप्पी एकमेकांना भेटतात आणि अमोलचा शोध घ्यायला निघतात.
Users Today : 21