अलिकडेच स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)च्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. ‘बाई गं’ (Bai Ga Marathi Movie) असे स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यात स्वप्नीलसोबत तब्बल ६ अभिनेत्री दिसणार आहेत.
यात सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे , अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान या अभिनेत्रींचा समावेश आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘चांद थांबला..’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘बाई गं’ चित्रपटातील ‘चांद थांबला..’ हे नवीन गाणे नुकतेच भेटीला आले आहे. हे गाणे प्रार्थना बेहरे आणि स्वप्नील जोशीवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातील या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना भावते आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, यात हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.
Users Today : 21