वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम ; ऍड. सचिन वामनराव पट्टेबहाद्दूर यांची आजाद समाज पार्टी जनसंपर्क कार्यालय चैतन्य कॉलोनी वाशिम येथे वाशिम जिल्हाअध्यक्ष पदी तर वाशिम जिल्हा महासचिव पदी राजेंद्र अंभोरे यांची निवड करण्यात आली.
महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि काशीरामजी साहेब यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी आझाद समाज पार्टी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. याच हेतू कोणातून वाशिम येथील एडवोकेट सचिन पट्टेबहादूर यांची आजाद समाज पार्टीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्या अगोदर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहेत. एडवोकेट सचिन पट्टेबहादूर यांची सामाजिक कार्य पाहता त्यांनी गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये गोरगरीब दलित व गरजू नागरिकांना न्याय हक्क मिळवून देऊन उल्लेखनीय कामगिरी केले आहे. अन्यायाविरुद्ध बंड पुकारून सत्या प्रतिन्याय दिनाचे कार्य त्यांनी केले आहे. एक होतकरू अभ्यासू उच्चशिक्षित व्यक्तिमत्व आणि व्यवसायाने वकील देखील असुन कायद्याचे नॉलेज( पदवी)त्यांच्याकडे असल्या मुळे सर्व सामानाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहेत. ही भावना पार्टीने समोरील ठेवून व त्यांना उत्तर प्रदेश नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष आझाद समाज पार्टी चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशाप्रमाणे अँड.सचिन वामन पट्टेबहादुर वाशिम जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले गोरगरिबांच्या नायकासाठी झटणारे व राजेंद्र उत्तमराव अंभोरे यांची देखील वाशिम जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टीला संघटनात्मक दृष्ट्या आर्थिक बळकटी मिळवून देणे तसेच आपल्यावर जी जबाबदारी दिली गेली ती आपण एक निष्ठपणे प्रामाणिकपणे पार पाडून आसपा पार्टीचे काम करण्याची शाश्वती त्यांना दिली आहे.
नियुक्ती पत्र देताना उपस्थित मनीष साठे महाराष्ट्र मुख्य महासचिव, पँथर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.चेतन भाई इंगळे वाशीम,अमरावती शहर अध्यक्ष विपुल भाऊ चांदे, राजेंद्र उत्तमराव अंभोरे सर वाशीम, आझाद समाज पार्टी (काशीराम) पदा आधिकारी अन्य कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
Users Today : 27