समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मंठा तालुक्यातील 16278 विद्यार्थ्यांना पहिल्या च दिवशी मोफत पाठय पुस्तके वाटप.

Khozmaster
1 Min Read
1ली मधील सर्व  नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत झाले
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा शाळेच्या पहिल्या च दिवशी
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठयपुस्तके योजना अंतर्गत इयत्ता1ली  ते 8वी वर्गाचे मराठी माध्यम, उर्दू व  सेमी इंग्रजी माध्यम पुस्तके 16278 विद्यार्थ्यांना वाटप झाली.
148 जिल्हा परिषद शाळा व 21
माध्यमीक अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना लाभ मिळाला. तालुक्यातील विद्यार्थ्यांना
मोफत पाठय पुस्तके वाटपा  ची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे माझी मंत्री व आमदार बबन रावजी लोणीकर यांनी मौलाना आजाद उर्दू शाळातील विद्यार्थ्यांना उर्दू माध्यमाचे पाठय पुस्तके वाटप करून केली.
तालुक्यातील सर्व 169 शाळा मध्ये पहिल्या च दिवशी मोफत पाठय पुस्तके वाटप
अशोक सोळंके, गट शिक्षणाधिकारी,
के जी राठोड , गट समन्वयक , सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, जगन्नाथ घुठ्ठे, रामदास माने, संतोष गिरेह, अभिमन्यू बायस, ज्योती चव्हाण, विद्या पतंगे, प्रशांत घाडगे, प्रशांत सोनटक्के, सदाशिव बोधने , बी के बोराडे, सदाशिव तोठे, गौतम वाहुळ व समग्र चा संपूर्ण स्टाफ यांच्या हस्ते विविध शाळा मध्ये केले.
0 9 4 7 8 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *