समाज क्रांती युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पदी उमेश इंगळे यांची निवड

Khozmaster
2 Min Read
अकोला प्रती – डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून ६ डिसेंबर १९९१ बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे समाज क्रांती आघाडी या सामाजिक आंदोलनाचा जन्म घातला.मुख्य उद्देश संविधानाचे संरक्षण व संविधानाचे राज्य निर्माण करणे उद्देशात प्रचंड वैचारीकता असल्याने समाजा मध्ये चळवळ रुजविण्याकरीता समाज क्रांती आघाडी कार्यरत आहे. मात्र आता संपूर्ण देशात संविधनाबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्याने आंदोलनाकडे जनता डोळसपणे पाहु लागली आहे.
म्हणुन सामाजिक व रुग्णसेवा क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ पणे कार्य करणाऱ्या उमेश सुरेशराव इंगळे यांच्या कार्याची दखल घेत आदरणीय बंडुदादा वानखडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या पुढाकाराने दि. १७/०६/२०२४ रोजी जिल्हा परिषद विश्रामगृह सिव्हिल लाईन अकोला येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांची समाज क्रांती आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष  हंसराजजी शेंडे यांच्या हस्ते सर्वानुमते निवड करण्यात आली. सामान्य नागरिकांनवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी समाज क्रांती युवक आघाडी महाराष्ट्र राज्य आणखी ताकदीनिशी काम करू असे मत उमेश इंगळे यांनी निवडीच्या वेळेस मांडले. तसेच या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन स्वाभिमानी संघटना समाज क्रांती आघाडी मध्ये विलिन केली असुन शेकडो कार्यकर्ते समाज क्रांती युवक आघाडी मध्ये सामील होणार आहेत.या आढावा बैठकीला समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे साहेब महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडू दादा वानखडे, बाबूलाल डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते सतीश तेलगोटे, संजय  इंगळे,सुनील वानखडे, अमर वासनिक, शिलवंत वानखडे, रितेश थोरात, शेषराव सिरसाठ, विलास वानखडे, अफसर मिर्जा बेग कुणाल दारोकार ईत्यादी समाज क्रांती आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त समाज क्रांती युवक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उमेश इंगळे आपल्या निवडचे श्रेय समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय बंडुदादा वानखडे यांना देतात.
0 6 7 6 2 0
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *