दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील प्रांगणामध्ये राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.) विभागामार्फत १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी या योग दिनाला डी. जी. एन. सी. सी. कडून “योगा स्वयम् और समाज के लिए” ही थीम देण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या मार्गदर्शनाने या योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी योगासनाचे प्रशिक्षण देण्यासाठी योगा शिक्षक प्रा. डॉ. मोनिका तापडिया यांचे सहकार्य लाभले. या योग दिनाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाने, एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर, डॉ. रतनलाल येऊल, डॉ. नागनाथ गुट्टे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात साठी महाविद्यालयातील सार्जंट स्वराज बोदडे, कॉर्पोरल धनश्री चव्हाण, कॉर्पोरल आदित्य वाकोडे, कॅडेट नयन घुगे, कॅडेट त्रिशब कोकाटे, कॅडेट प्रेम अहिर, कॅडेट यशवंत हरसुलकर, कॅडेट गुणवंत गुजर, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट आयुष थोरात, कॅडेट अभिषेक बोराडे, कॅडेट शुभम दुबे, कॅडेट सोकांश धवाने, कॅडेट प्रवीण सोळंकी, कॅडेट सुमित मंगुळकर, कॅडेट पवन गिरी, कॅडेट निखिल सभादिंडे, कॅडेट अब्दुल आवेस, कॅडेट कल्याणी आमले, कॅडेट लक्ष्मी सूळे, कॅडेट मोनिका ददगाल, कॅडेट सारिका यादव, कॅडेट धनश्री दाणे, कॅडेट उर्मिला बुंदेले, कॅडेट हर्षा गायकवाड, कॅडेट निशा अरुलकार, कॅडेट आरती कोंडेकर, कॅडेट प्राची वरुडकर, कॅडेट सनिका राजेधर, कॅडेट मानसी दळवी, कॅडेट तन्वी मलगन, कॅडेट निवेदिता भोसले, कॅडेट नीतीक्षा पांडे, कॅडेट साक्षी झटाले, कॅडेट भूमि काशिद, कॅडेट आर्या गंगाखेडकर, कॅडेट लिना काळे, कोमल मेश्राम, कॅडेट श्रध्दा पांडे, कॅडेट प्रेरणा गोतमारे व कॅडेट सिमरन इंगळे असे एकूण ४३ एन. सी. सी. कॅडेटनी सहभाग घेतला होता. एन. सी. सी. कॅडेट्सनी राबविलेल्या या कार्यक्रमाबद्दल दि. बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, उपाध्यक्ष इंजि. अभिजित परांजपे, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, सहसचिव सी.ए. विक्रमजी गोलेच्छा व समस्त कार्यकारी सदस्यांनी यांचे कौतुक करून अभिनंदन केले.