स्थानिक ; वाशिम येथे १० ,आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहामध्ये मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह सिव्हीला रोड वाशिम येथे उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला आहे.. या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन वस्तीगृहाच्या गृहपालिका वर्षा लाकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर विद्यार्थी यांनी सकाळी ६ ते ७ या वेळेस एक तास योगासन करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक संदेश देखील देण्यात आला. मानवाच्या आयुष्याला योग जसा महत्त्वाचा आहे तसेच पर्यावरण संवर्धन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यावरण जर आपण जपले तर भविष्यातील आरोग्य देखील निरोगी राहील. वसमत पर्यावरण प्रेमी वन्यजीव रक्षक सर्पमित्र प्रदीप पट्टेबहादूर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी वर्षा लाकडे मॅडम यांनी योगाचे फायदे सांगून शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आपण कसा राहू शकतो आणि आपल्या जीवनाचे दिवस आनंददायी कशी जगू शकतो यावर मार्गदर्शन केले. यावेळी १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ ची *थीम ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’* आहे. थीम महिलांच्या सर्वांगीण कल्याणात योगाच्या भूमिकेवर जोर देते आणि शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक माध्यमांद्वारे त्यांच्या सक्षमीकरणावर जोर देऊन महिलांच्या जीवनावर योगाच्या परिवर्तनात्मक प्रभावाला प्रोत्साहन देते. या थीम अंतर्गत, महिलांना योगाच्या फायद्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात त्याचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. तर यावेळी उपस्थित क्षितिज फाउंडेशन जिल्हा समन्वयक अतुल राऊत, पर्यावरण प्रेमी वन्यजीव रक्षक जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन प्रदीप पट्टेबहादूर, गृहपालीका वर्षा लाकडे, वस्तीगृहातील विद्यार्थिनी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
Users Today : 27