मुगाच्या बाजारभावाला झळाळी, पेरा घटल्याने भविष्यात वाढणार बाजारभाव

Khozmaster
2 Min Read

वाशिम जिल्ह्यासह राज्यात कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे. आता पावसाळ्यात कडधान्यांच्या मागणीत वाढ होत असताना मूग  आणि उडिदाचा साठा मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे बाजार समित्यांत या शेतमालाचे दर गगनाला भिडले आहेत.

तथापि, शेतकऱ्यांकडे हा शेतमाल फारसा शिल्लक नसल्याने दर वाढूनही बाजार समित्यांत या शेतमालाची आवक मात्र नगण्य आहे. शनिवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला कमाल ७ हजार ८०० रुपये, तर उडिदाला कमाल ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता.

यंदाही पेरा राहणार कमीच
जिल्ह्यातील शेतकरी मूग आणि उडीद या पिकांच्या पेरणीबाबत उदासीन आहेत. या पिकांचा खर्च अधिक असताना वन्य प्राण्यांचा या पिकांमध्ये मोठा उपद्रव असतो. तसेच कमी कालावधीच्या पिकांना अवर्षण, अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदाही खरीप हंगामात या पिकांचा पेरा कमीच राहण्याची शक्यता आहे.

दर आणखी वाढण्याची शक्यता
देशभरात गेल्या काही वर्षांत मूग आणि उडीद या कडधान्य पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनही घटले आहे. त्यात गतवर्षी मान्सून उशिरा दाखल झाल्याने या पिकांचे क्षेत्र नावापुरतचे होते. परिणामी यंदा शेतमालाला मोठी मागणी असल्याने पुढील काळात मूग आणि उडीद या दोन्ही शेतमालाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

शनिवारी मूगाचे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत आवक कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

22/06/2024
अमळनेर चमकी 5 7200 7400 7400
लोणार चमकी 5 6000 7280 6640
पातूर चमकी 2 7150 7150 7150
लातूर हिरवा 11 5500 7400 7300
येवला हिरवा 1 5500 5500 5500
अकोला हिरवा 131 6860 7645 7360
पुणे हिरवा 44 9200 10100 9650
मुर्तीजापूर हिरवा 15 6850 7400 7175
औराद शहाजानी हिरवा 3 6501 6501 6501
भंडारा हिरवा 4 6600 6600 6600
नागपूर लोकल 25 6800 7000 6950
अहमहपूर लोकल 5 6800 6800 6800
नादगाव खांडेश्वर लोकल 1 5800 6650 6225
अमरावती मोगली 6 7000 7500 7250
0 8 9 4 6 0
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *