अकोल्याच्या मोरगाव येथील शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Khozmaster
1 Min Read

अकोला: जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते.

त्यांच्यावर सोमवार, ८ जुलै रोजी मोरगाव भाकरे येथे राजशिष्टाचारानुसार व बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव सैन्यदलाच्या तुकडीकडून मूळ गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाची तुकडी, तसेच पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

खासदार अनुप धोत्रे, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार नितीन देशमुख, आमदार संजय कुटे, जि.प.अध्यक्ष संगीता अढाऊ, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्यदलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ‘शहिद प्रवीण जंजाळ अमर रहे’च्या घोषणांनी परिसर निनादला होता.

सैनिकांचे गाव म्हणुन मोरगांव भाकरे गावाची ओळख असून येथे आजवर ९० युवक सैन्यात भरती झालेले आहेत. शहीद जवान प्रविण जंजाळ यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

0 6 6 8 7 1
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *