महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने एक पाऊल!

Khozmaster
1 Min Read
आज जळगांव येथे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी जी यांनी येथे देशातील लखपती दीदींबरोबर संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली.
येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर आयोजित लखपती दीदी संमेलनापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक अशा ८० लखपती दीदींशी संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बॅंक सखी दिदी, ड्रोन दीदी, पशु दीदी, कृषी दीदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला उपस्थित होत्या.
यावेळी राज्याचे राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन,राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री मा.ना.श्री. शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री मा.ना श्री. देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे,पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील,ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
0 9 4 5 4 4
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *