माझ्या संकल्पनेतून साकार झालेल्या बळीराजा स्मारकाचे पूजन करून मोठया उत्साहात बैलपोळा सण संपन्न झाला…!
बुलडाणा-दरवर्षी प्रमाणे यावर्षी बुलडाणा येथील जुनागाव वेशमध्ये माझ्या नियोजनात बैलपोळा मोठ्या उत्साहात पार पडला बैलांची संख्या नगण्य तर जनतेची संख्या असंख्य होती सुरुवातीला सर्व जेष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान माझ्या हस्ते हनुमान मंदिर जुनागाव येथे मानाचा रुमाल, टोपी व नारळ देऊन करण्यात आला..!
त्यानंतर मानाची गुढी घेऊन निलेश वैद्य, उमेश वाघमारे, सुधीर शेळके यांनी मंदिरासमोर आणल्यानंतर ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या साक्षीने गुढी वाजत गाजत पोळ्यामध्ये आली येथे वेशीमध्ये तोरणा खाली मानाच्या बैलांची पूजा केली त्यानंतर तोरण तोडून पोळा फोडण्यात आला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता..!
पोळा शांततेत पार पाडण्याकरिता महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक आशिष जाधव, मल्हारी गायकवाड, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, सचिन गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी तसेच नागरिकांचे सहकार्य लाभले, यावेळी त्याठिकाणी शहरातील कष्टकरी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
Users Today : 132