मदार श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी ‘द केरला स्टोरी-२’चे मोफत प्रदर्शन 🎬👩‍🦰

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली –

दयावान फाउंडेशन आणि जय मातादी मित्र मंडळ यांच्या वतीने श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा समाजजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी The Kerala Story 2 या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला चिखली शहरातील महिलांनी आणि तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती दिसून आली. समाजातील वास्तव परिस्थिती, महिलांवर होणारे अत्याचार तसेच सामाजिक घडामोडींचे वास्तववादी चित्रण या चित्रपटातून मांडण्यात आले. चित्रपटातील काही प्रसंग पाहताना अनेक महिला भावूक झाल्याचे दिसून आले. 🎥

महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या भूमिकेचे स्वागत

महिलांवरील वाढते अत्याचार आणि तथाकथित ‘लव्ह जिहाद’च्या घटनांबाबत समाजात जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याची भूमिका श्वेता महाले यांनी अनेकदा मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचा मान राखत हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल उपस्थित महिलांनी आयोजकांचे आभार मानले तसेच श्वेता महाले यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले. समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

या वेळी कांचन ऋषभ महाले यांनीही महिलांसोबत संपूर्ण चित्रपट पाहिला. ‘The Kerala Story 2’ला महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. 👏🎬

0 9 4 9 6 1
Users Today : 133
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *