आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मानवतेचा स्पर्श; मिठाई व फळवाटपाचा उपक्रम 🎂🤝

KHOZ MASTER
1 Min Read

देऊळगाव राजा  –

श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सचिन नागरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले. या उपक्रमातून समाजातील वंचित घटकांमध्ये आनंद वाटण्याचा संदेश देण्यात आला.

देऊळगाव मही येथे अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. ‘वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे,’ हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. 🍬

तसेच जि.प. प्राथमिक शाळा, खैरव येथे विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि पोषणमूल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. 🍎🍌

या वेळी मुख्याध्यापक अरुण खेडेकर, सहशिक्षक नरहरी बंगाळे, भागवत निकम तसेच आशा आघाव उपस्थित राहून उपक्रमास सहकार्य केले.

कार्यक्रमात सचिन नागरे, उमेश सोसे, गणेश म्हस्के, रवि टाले, रितेश लहाने, विकास लहाने, संगीता नागरे, गौरव घुगे, संघर्ष लहाने आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सर्वांच्या सहकार्यामुळे हा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा होऊन एक आदर्श निर्माण झाला. अशा उपक्रमांमधून सामाजिक जाणीव आणि मानवतेची भावना जोपासली जाते, असा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

0 9 4 9 5 7
Users Today : 129
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *