सतीश पाटील तेजनकर
लोणार प्रतिनिधी:- दिनांक ०२/१०/२०२२ रोज रविवारला वेदांत आश्रम सुलतानपूर येथे लोणार तालुका वारकरी महामंडळा च्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी वरील आवाहन केले.सविस्तर वृत्त असे की धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी वारकऱ्यांच्या मागणी नुसार बुलढाणा शहरामध्ये दोन कोटी पन्नास लक्ष रुपयाचे वारकरी भवन मंजुर करून घेतले आहे आणि त्याचा भूमिपूजन सोहळा दिनांक १३/१०/२०२२ ला आयोजित केला आहे. या भूमिपूजन सोहळ्याला वारकऱ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी केले. या बैठकीमध्ये. वृध्द कलावंत मानधन साठी असलेल्या जाचक अटी रद्द करणे. वारकऱ्यांना एस टी प्रवासामध्ये पंच्याहत्तर टक्के सुट मिळणे. मुस्लिम मदरशा प्रमाणे वारकरी शिक्षण संस्था तसेच मंदिरातील पुजाऱ्यांना मानधन मिळणे. तसेच जगदगुरु तुकोबाराय वारकरी आर्थिक विकास महामंडळा ची स्थापना करणे. ह्या व इतर मागण्या मुख्यमंत्री महोदय यांच्या कडून मंजूर करून घेण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला. या बैठकीमध्ये लोणार तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ वारकरी हजर होते. या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे. राजेन्द्र महाराज तळेकर विदर्भ अध्यक्ष. सतीश महाराज तेजणकर ज्येष्ठ समाजसेवक. गजानन महाराज ठेंग. यांची समायोचीत भाषणे झाली. या बैठकीमध्ये रामदास महाराज धांडे तालुकाध्यक्ष लोणार. शुभम महाराज तांगडे. संतोष महाराज बोबडे. दहातोंडे महाराज. काळे महाराज. रत्नपारखी महाराज. गणेश महाराज अंभोरे. यासह शेकडो महिला व पुरुष वारकरी हजर होते. वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला वारकऱ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Users Today : 11