आज लोणार तालुक्यातील टिटवी,नांद्रा मुंढे,रायगाव,सावरगाव मुंढे या शिवारामध्ये ढगफुटी व अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी घेत धीर दिला.
येथील नदीकाठची दोन्हीबाजूची पेरलेली शेते खरडून गेली. शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील माती वाहून गेली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बळीराजाचे नुकसान झाले आहे.पावसामुळे प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी केली.
नुकसान झालेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात सूचना केल्या.
व यावेळी
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. भगवान पाटील सुलताने, शहरप्रमुख मा.पांडुरंग सरकटे, माजी जि.प.सदस्य भगवानभाऊ कोकाटे व प्रमुख पदअधिकारी व महसूल विभागाचे श्री.रविंद्र जोगी साहेब,तहसीलदार भुषण पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री.काळे साहेब,कावरके साहेब, गटविकास अधिकारी श्री.देशमुख साहेब व ग्रामसेवक,तलाठी,मंडळ अधिकारी उपस्थित होते.
Users Today : 132