चिखली तालुक्यातील गोरगरीबांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी आज सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या या मोर्चाचे नेतृत्व करताना सरकारला कडक इशारा देण्यात आला की, जर घरकुलांच्या प्रश्नाची तातडीने सोडवणूक झाली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
मोर्चात महिला, वृद्ध, आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ज्यामुळे गरीब व वंचित घटकांच्या घरकुलाच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
Users Today : 132