नागरिक व शेतकरी बांधवांनसाठी निवेदन
बीड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावरील परिसराती नागरीकांनी सद्यस्थितीत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
संततधार पावसामुळे चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल रहदारीसाठी बंद केला आहे. पेठबीड व शहर पोलीसांना कळवून त्याठिकाणी बॅरीकेटस् लावण्याच्या सुचना केली आहे.
खासबाग देवी मंदीर परिसरात मा. तहसीलदार यांच्या सोबत नदीकाठच्या परिसराची पाहणी केली. नगर परिषद चे कर्मचारी त्याठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील पुलावर भेट दिली, परिस्थिती चा आढावा घेतला.
- मा. जिल्हाधिकारी महोदय यांना जिल्हा प्रशासना मार्फत नदी काठच्या परिसरात तहसीलदार व महसूल यंत्रणे कडून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सूचना केली. मा. पोलीस अधीक्षक यांना पोलीस विभागा मार्फत योग्य खबरदारी घेण्याच्या व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅरीकेटींग करण्याच्या सूचना केल्या आहेत.
अतिवृष्टीने अनेक भागात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांनी पिकांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला तात्काळ कळवावी. नुकसानग्रस्त पिकांची सूचना वेळेवर दिल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल.
Users Today : 18