बीड प्रतिनिधी :-
तालुक्यातील मांजरसुंभा–पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी शिवारातील वनक्षेत्रात बुधवार (दि. १२) सकाळच्या सुमारास एक काळवीट मृतावस्थेत आढळून आले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
घटनास्थळी परिस्थिती
काळवीटाच्या शरीरावर कोणतीही गंभीर जखम आढळली नाही, मात्र पोटाचा भाग फाटलेला व छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीट ठार झाले असावे, असा वन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बीड वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन उचलला नसल्याने तात्काळ कार्यवाही होऊ शकली नाही, अशी खंत डॉ. ढवळे यांनी व्यक्त केली.
“तातडीचा प्रतिसाद मिळाला नाही” — डॉ. ढवळे
“पूर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे हे अशा घटनांवर तत्काळ प्रतिसाद देत. मात्र सध्याचे अधिकारी अमोल सांगुळे यांनी फोन न उचलल्याने तत्काळ पथक रवाना होऊ शकले नाही, ही खेदजनक बाब आहे,”
असे डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले.
ग्रामस्थांची उपस्थिती
या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिस स्टेशनचे प्रशांत क्षीरसागर, महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी, तसेच विशाल घरत, संदिप घरत, ऋषिकेश घरत, शंकर घरत, सतिश घरत आणि इतर ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीची चौकशी आणि परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे
महाजनवाडी शिवारात काळवीट मृतावस्थेत; भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने ग्रामस्थांत नाराजी
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment