माझ्या नावाचा अपप्रचार करणाऱ्यांची चौकशी अहवाल सादर करून कडक कारवाई करा..
जाफराबाद.दि.५.(विजय खरात) जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,जालना.यांना ०३/०९/२०२४ रोजी दिलेल्या पत्रामध्ये ग्रामपंचायतीकडुन बांधकाम कामगारांना कामगार असल्याचे प्रमाणपत्र न देता माझ्या नावाचा अपप्रचार करणारांची चौकशी करून कडक कारवाई करावी व बांधकाम कामगारांना ग्रामपंचायतीकडुन प्रमाणपत्र देणे पुर्ववत सुरू करावे अश्या आशयाचे पत्र देण्यात आले असून पत्रामध्ये म्हटले आहे की वरील विषयाच्या अनुषंगाने प्राप्त निवेदनावरून जालना जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना शासनाने सुरू केलेल्या सुरक्षा संच व गृहपयोगी साहित्य मिळण्यासाठी प्रस्तावामध्ये ९० दिवस कामे केल्याचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. यापुर्वी सदरहू प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडुन देण्यांत येत होते. परंतु आता सदर प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच ग्रामसेवकांकडुन प्रमाणपत्र न देण्याचे आदेश मी दिल्याचे सांगण्यांत येत आहे. ही बाब अतिशय खेदजनक असून,गंभीर स्वरूपाची आहे. यामध्ये प्रामुख्याने भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यात या पध्दतीचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. समस्त बांधकाम कामगारांमध्ये या प्रकारामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. लाभार्थ्यांना विनाकारण त्रास देऊन वेठीस धरल्या जात आहे.
तरी सदरहू बाबीची सखोल चौकशी करून अपप्रचार करणाऱ्यावर कडक कारवाई करून अहवाल सादर करण्यांत यावा. तसेच बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केलेल्या प्रमाणपत्र यापुर्वी देण्यांत येत होते ते पुर्ववत देणे सुरू करण्यांत यावे जेणे करून शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळेल.
दरम्यान ज्या बांधकाम लाभार्थ्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत तरी संरक्षण संच तथा गृह उपयोगी सामाना पासून केवळ राजकीय द्वेषापोटी ज्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे त्या गोडाऊनमधून बंदिस्त असलेल्या अत्यावश्यक वस्तू चा मार्ग कधी मोकळा होतोय या प्रतिक्षेत बांधकाम लाभार्थ्यांनी…
Users Today : 132