लोणार शहरातील मायबाप जनतेने सहकार्य केल्यास आणि आशीर्वाद दिल्यास लोणार नगर परिषद माझ्यासारखे लोक सोबत घेऊन मी लढण्याचे विचारात आहे कारण लोणार मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही..
वर्षानुवर्ष दोनच पक्ष्यांच्या हातात लोणारची नगरपरिषद आलेली आहे एक म्हणजे काँग्रेस आणि दुसरी म्हणजे शिवसेना दोन्हीही पक्ष लोणारचा साधा पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही हे सगळ्या जनतेला माहिती आहे कित्येक वेळेस नळ योजनेसाठी करोडो रुपये आले नळ योजना राबविण्यात आल्या परंतु त्याचा काहीही एक फायदा न होता त्या कागदावरच राहिल्या हे आपण सगळं उघड्या डोळ्यांनी आजपर्यंत बघत आलेलो आहे मला माहित आहे मी एकटा निवडणूक लढवून निवडून येणं इतकं सोपं नाही पण तरीही प्रयत्न करणं आपलं काम आहे म्हणून मी एक प्रयत्न करणार आहे जनतेने सहकार्य केल्यास ही निवडणूक लढण्याच्या विचारात आहे.
जर मी आणि माझ्यासारखे तरुण कार्यकर्ते निवडून आले तर खालील प्रमाणे कामे प्रामुख्याने राबविण्यात येतील
1) प्रथमतः लोणार नगरपरिषद हद्दीमध्ये असलेली हजारो हेक्टर एकलासची जमीन त्या जमिनीवर प्लॉटिंग पाडून ती विनामूल्य घरी लोकांना आणि ज्यांना जागा कमी आहे अशा मध्यमवर्गीयांना ते प्लॉट विनामूल्य वाटण्यात येतील देण्यात येतील त्यामुळे जे गरीब लोक प्लॉट घेऊ शकत नाहीत घर बांधू शकत नाही त्यांचा खूप मोठा प्रश्न सुटेल.. (आणि तेही वेगवेगळ्या समाजाचा वेगवेगळ्या एरिया तयार करून प्लॉट काढण्यात येतील)
2) असेच लोणार मध्ये असलेली लोणी रोड टच तहसील कार्यालयासमोर दुतर्फा कॉम्प्लेक्स काढून गरीब होत करू गरजू तरुणांना मोफत 99 वर्षाच्या लीजवर नाममात्र भाड्याने वाटण्यात येतील..
3) हे सगळं शक्य होणार आहे कारण लोणार ला 300 कोटी रुपयांचा निधी आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी व्हिजन असलेले लोक निवडून गेले पाहिजे तेव्हा गरिबांचं भलं होईल आणि या भूमाफिया लोकांवर अंकुश निर्माण होईल.
4) गरिबांना मोफत प्लॉट व गाडी भाड्याने वाटण्यात येतील व्यवसाय करण्यासाठी..
पर्यावरण म्हणजे दुर्गा टेकडी आईचे तलाव लिंबी 12 जवळील मेंढी त्याला यांचे सौंदर्यीकरण करून पर्यावरणाचे रक्षण करण्यात येईल ज्याला प्लॉट मिळेल त्याला प्लॉट समोर झाड लावणे सक्तीचे करण्यात येईल.
5) लोणार मध्ये स्वच्छतेवर जो दर महिन्याला लाखो रुपये खर्च दाखवण्यात येतो तो स्वच्छता करण्यासाठीच राबवण्यात येईल आणि स्वच्छ लोणार सुंदर लोणार करण्याचा प्रयत्न असेल आणि तो प्रामुख्याने राबविण्यात येईल
6) लोणारचं पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यात येईल तसेच लोणारचे रोड आणि अतिक्रमण काढण्यात येईल ते कोणाचेही असले तरी आणि डिव्हायडर आणि स्त्रीलाईट लावण्यात येतील..
7) वरील सगळे प्रश्न सोडवणे अत्यंत सोपी आणि शक्य आहे फक्त त्या ठिकाणी निस्वार्थी माणूस निवडून यायला पाहिजे त्यामुळे गावाचे भले होईल आणि लोणार शहर खऱ्या अर्थाने जागतिक पर्यटन स्थळ होईल कारण तितका नीती लोणार साठी आलेला आहे आणि त्या निधीवर पुढारी लोकांचा डोळा आहे याचा जनतेने विचार करावा.
8) बचत गटातील महिलांना मोफत व्यवसाय करण्यासाठी साहित्य आणि भाग भांडवल उभा करण्यासाठी अल्प व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल
9) लोणार शिवारातील सगळे पांदण रस्ते मृत पावलेली रस्ते आणि लोणार चा लाईन चा प्रश्न विजेचा प्रश्न कायमचा सोडवण्यात येईल म्हणजे तार काढून केबल टाकण्यात येतील
10) तसेच वरील सगळे कार्यक्रम राबवल्यामुळे जनतेला प्लॉट आणि गाडी फुकट मिळाल्यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न कराच्या रूपाने आपोआप वाढण्यास मदत होईल आणि जनतेला सुद्धा मोफत प्लॉट आणि गाडी व्यवसाय करण्यासाठी भेटतील तसेच नगरपरिषद मार्फत एक मोठा रोजगार उपलब्ध होईल असा सोयाबीन प्लांट सारखा उद्योग उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल
टीप वरील सगळ्या गोष्टी शक्य आहेत फक्त नगरपरिषद मध्ये चांगले लोक व्हिजन असलेले लोक निवडून गेले पाहिजे मी एक छोटासा प्रयत्न करण्याचा विचारात आहे शेवटी सगळ्या गावाचा कानोसा घेऊन उभे राहावं की नाही याचा विचार करून निवडणूक लढण्यासाठी जर गावातील लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तरच उभा राहणार आहे नाहीतर नाही धन्यवाद आपलाच विनायक गोपाळराव मापारी लोणार सामाजिक कार्यकर्ते
Users Today : 132