Khozmaster
2 Min Read

अहिल्यानगर ( अहमदनगर ) – नुकत्याच दि. २५-०८-२०२४ रोजी येथील स्थानिक संत भगवानबाबा चौकातील गंगा लॉन्स च्या भव्य सभागृहात, वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीच्या वतीने आयोजित, वंजारी समाजाच्या दुसऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ कवी डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांच्या अंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त – त्या तरूच्या सावलीला, चल सखे बोलू जरा – या मर्मभेदी कवितेच्या, त्यांच्याच सुमधुर आवाजातील गायनाने सारे सभागृह भारावून गेले. प्रा. संगीता घुगे यांच्या अध्यक्षतेखाली,  मावळते अध्यक्ष मा. प्रा. वा.ना.आंधळे, स्वागताध्यक्ष अंतर्राष्ट्रीय कुस्ती पटू मा. राजकुमार आघाव, अहिल्यानगर, सहस्वागताध्यक्ष मा. रेणूका वराडे, वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेशजी खाडे, अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार तथा प्रमुख अतिथी मा. संग्रामभैया जगताप इ. दिग्गजांच्या प्रमुख उपस्थितीत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ( औरंगाबाद ) छ. संभाजीनगर चे महाराष्ट्र राज्य राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य मा. प्रा. डॉ.गजाननराव सानप यांच्या शुभहस्ते उदघाटन झालेल्या या भव्यदिव्य साहित्य संमेलनात वास्तविक कुठलाही सहभाग नसताना, बुलढाणा जिल्ह्यातील नुकत्याच सुरू झालेल्या पण अल्पावधीतच अटकेपार घोडदौड करणाऱ्या सिंदखेड राजा येथील दै. लोकनेता चा संपादक असलेल्या तरूणतुर्क आयुष्मान ज्ञानेश्वर बुधवतला संपादकीय प्रभावी कार्यासाठी या संमेलनात राज्यस्तरीय व बहुमानाचा राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान होणार असल्याकारणाने,  मित्राच्या त्या ऐतिहासिक सन्मान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी परकायाप्रवेशी कथाकथनास्तव साऊथवस्टर्न अमेरिकन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त सुप्रसिद्ध कथाकार डॉ. बबनराव महामुने तथा भावकवी आयुष्मान अंकुश पडघान यांच्या सह आकस्मिक आलेले असतांना, छ. संभाजीनगर चे ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रा. डॉ. रामकिसन दहिफळे यांच्या आग्रहाखातर डॉ. विजयकुमार कस्तुरे यांना आपल्या उपरोक्त कविता गायनाची तथा डॉ. महामुने यांना त्यांच्या कथाकथनाची संधी, आयोजकांकडून पाहूणे कलावंत म्हणून मिळाली आणि उभयतांनी आपापल्या सादरीकरणाने सबंध संमेलन गाजविले अन् उपस्थित सर्व साहित्य रसिकांनी टाळ्यांच्या गजराने सभागृह दणाणून सोडले.
तद्वतच सादर सत्कार करून सन्मानित केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *