बलात्काराच्या दोन घटना: अत्याचारामुळे अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन, बल्लारपूर हादरले

Khozmaster
1 Min Read

ल्लारपूर (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या. एका घटनेत अत्याचाराच्या मानसिक आघाताने अल्पवयीन पीडित मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

तर दुसऱ्या घटनेतील पीडिता ही ३५ वर्षीय गतिमंद महिला आहे. या दोन्ही घटनांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

शिवम दिनेश दुपारे (२०, बल्लारपूर) याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले. मुलीला २ सप्टेंबरला रात्री लॉजवर नेले. तेथे तिचे लैंगिक शोषण केले. अचानक घडलेल्या या घटनेने पीडितेला जबर मानसिक धक्का बसला. तिने बुधवारी राहत्या घरी आत्महत्या केली.

दारूच्या नशेत घुसला महिलेच्या घरात
दुसऱ्या घटनेत ३५ वर्षीय गतिमंद महिलेवर ५८ वर्षीय इसमाने अत्याचार केला. अटक झालेल्या आरोपीचे नाव चंदू बालू भुक्या (५८, बल्लारपूर) असे आहे. तो २ सप्टेंबरला दुपारी दारूच्या नशेत मतिमंद महिलेच्या घरात घुसला. अत्याचार करून तो निघून गेला.

0 9 5 0 1 0
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *