Khozmaster
2 Min Read

चिखलीः गौरी सजावट स्पर्धेत महिलांनी सहभागी व्हावे – अॅड.सौ.वृषालीताई बोंद्रे

हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण तर्फे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

चिखली: 05 सप्टेंबर 2024
चिखली परीसरासह जिल्हयातील महिलांच्या कल्पकतेला आणी सृजणषिलतेसह सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उदांत हेतुने हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने तालुका स्तरीय गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. प्रतिष्ठाण व्दारे आयोजित गौरी सजावट स्पर्धेत शहरी तथा तालुकाभरातील महिलांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन हिरकणी महिला प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केले आहे. ष्
हिकरणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन गत 13 वर्षापासुन सलग नवनविन कल्पकतेतून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, यात प्रामुख्याने महिलांचा सर्व स्तरातून विकास व्हावा हया उद्येषाने सामाजिक, सांस्कृतीक, धार्मीक, आर्थीक आणी आरोग्य विषयक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येतात. गौरी (महालक्ष्मी) सजावट स्पर्धेच्या माध्यमातुन स्त्रियांचा उत्साह वाढवावा या दृष्टीने हया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. गौरी सजावट स्पर्धेत आकर्षक सजावट, मखर डेकोरेषन, रांगोळी, फुलोरा, त्याचबरोबर गौरींची आकर्षक वेषभुषा, अलंकार परिधान, अषा विविध छटा दर्षविणा-या गौरी या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे.
हिरकणी प्रतिष्ठाण सौजन्याने दिनांक 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत आयोजित स्पर्धेत प्रथम विजेत्यास आकर्षक पैठणी, इतर विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरीता 09 सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करणे करण्यात येणार असुन स्पर्धेकरीता परिक्षकांचा निर्णय अंतीम राहणार आहे. स्पर्धकांनी नोंदणीकरीता 9168577111, 9822614661, 8805780456, 7020713355, 7588419833, 7588564774, 9767456781 व 8830380996 संपर्क साधवा असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
 

0 9 4 9 6 0
Users Today : 132
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *