सहकार गणेष मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराधा अर्बनचे
नितीन गायके बिनविरोध
चिखली: 05 सप्टेंबर 2024
चिखली शहरात गत 6 वर्षापासुन राष्ट्रीयकृत बॅंक, सहकारी बॅंक, पतसंस्था इत्यादी जवळपास 100 हुन अधिक शाखा सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. विदर्भात चिखलीचे नाव अग्रस्थानी आहे, सहकार गणेष मंडळाची स्थापनेचे हे 7 वे वर्ष असुन यावर्षी सहकार गणेष मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराधा अर्बन बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन गायके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अनुराधा अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायके यांची सहकार गणेष मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली, याबध्दल अनुराधा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे, हिरकणी महिला अर्बनच्या अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतिषसेठ गुप्त, अंबिका अर्बनचे विजुभाउ कोठारी, उपाध्यक्ष डॉ. विष्वनाथ यादव, धनश्री नागरीचे अध्यक्ष अजय कोठारी, प्रदिप हाके, बालाजी अर्बनचे अॅड मंगेष व्यवहारे, श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक देषमाने, विलास भडाईत, श्रीराम नागरी पससंस्थेचे अध्यक्ष पंडीतराव देषमुख, बसवेष्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शैलेष अय्या, इंदिरा नागरीचे अध्यक्ष पप्पुसेठ हरलालका, समता अर्बनचे सदाषिव देषमुख, आदि सह शहरातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी नितीन गायके यांचे अभिनंद केले आहे.
Users Today : 132