बुलडाणा
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे , चूनपिंपरी , बेरदड शिवारातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी 2023-24 मध्ये आपल्या पिकाचा विमा काढला होता. त्यामधून काही लोकांना पिक विमा मिळाला असून काही लोकांना विमा मिळाला नाही त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी बुलडाणा यांना 20 ते 25 शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद आहे की आम्ही मागील वर्षी पिक विमा काढला होता परंतु आम्ही तक्रार किंवा क्लेम केला नसल्यामुळे आमचे नाव यादीत आले नाही त्याकरिता आम्हाला पिक विमा देण्यात यावे, अशी मागणी धामणगाव बढे परिसरातील शेतकरी यांनी केली आहे. या निवेदनावर चरण सिंग गोबरा राठोड , कनीराम रोडू राठोड, मदनसिंग गणपत राठोड, उदयसिंग मोहन राठोड , बिरबल सूर्यभान राठोड, हिरासिंग आसाराम राठोड , गजानन रंगलाल राठोड, जगराम रतन पवार, हरसिंग मानसिंग चव्हाण, दुबा उगराज राठोड, शिवा मारू जाधव, कौतिक शेषमल राठोड, शिवा जयसिंग राठोड, हरिदास बुका राठोड, सुरेश थावरू राठोड, रमेश रतन राठोड, हंजारी रायसिंग चव्हाण, संजय बाबू सिंग राठोड, यांच्या सह शेतकरी बांधव उपस्थित होते.
Users Today : 134