दिनांक 4 सप्टेंबर 2024 ला सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे संपन्न झालेल्या शालेय *जिल्हास्तरीय* रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये विद्यालयातील *6 रोलर स्केटर्सनी* यश प्राप्त करून *विभागस्तरीय* स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेमध्ये *कु. मनीषा भणगे* वर्ग 10 हिचा 17 वर्षाखालील गटात क्वाड प्रकारात *प्रथम क्रमांक* 19 वर्षाखालील गटामध्ये क्वाड या प्रकारात *मयन ठेंग* वर्ग 12 *प्रथम क्रमांक* इनलाईन या प्रकारात *स्वरूप डहाके* वर्ग 11 वा याचा *प्रथम क्रमांक*, क्वाड या प्रकारात *नैतिक ठेंग* वर्ग 11 वा याचा *द्वितीय क्रमांक*, 14 वर्षाखालील गटात इनलाईन या प्रकारात *तन्मय अवचार* वर्ग 8 वा याचा *तृतीय क्रमांक*,17 वर्षाखालील गटात इनलाईन या प्रकारात *श्रेयश खरात* वर्ग 10 वा याचा तृतीय क्रमांक आला या सर्व खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.रामकृष्णदादा शेटे,सचिव प्रेमराजजी भाला,सर्व संचालक, प्राचार्य सतीशजी गव्हले, उपप्राचार्य रामेश्वरजी कुटे,पर्यवेक्षक दंडे सर, तायडे सर, शिक्षक बंधू भगिनींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Users Today : 134