शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याचे निर्देश मा.ना.श्री.दादाजी भुसे साहेब यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या मौजे सावरगाव माळ येथे कृषी समृध्दी नवनगर (स्मार्ट सिटी) विकसित करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील मंत्रालयात यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी माझ्या समवेत,माजी आमदार श्री.शशिकांत खेडेकर,एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अ. ब. गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, व्यवस्थापक दत्तप्रसाद नडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Users Today : 134