(शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रलंबित रक्कम न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार — गोपाळराव बोराडे)…..
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
जनकल्याण विकास मंचच्या वतीने सन 2023 – 24 च्या खरीप सोयाबीन, कापूस इत्यादी पिकांचा 75 टक्के प्रलंबित विमा शेतकऱ्यांना तात्काळ द्यावा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. गुरुवार ता.5 रोजी बाजार समितीचे उपसभापती गोपाळराव बोराडे, जनकल्याण विकास मंचचे संस्थापक कल्याणराव बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मंठा, परतूर, नेर – सेवली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना 2023 – 24 च्या पिकांचा 75 टक्के प्रलंबित विमा तात्काळ द्यावा यासह सोयाबीन प्रति क्विंटल 6000 भाव देण्यात यावा, कापूस बारा हजार पर्यंत भाव देण्यात यावा, चालू वर्षी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, पांगरी खुर्द या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, समृद्धी महामार्ग जालना ते नांदेडच्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मुंबई ते नागपूरच्या समृद्धी महामार्ग दराप्रमाणे भाव देण्यात यावा, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेती संरक्षण मिळावे आदि मागण्या मान्य करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांचा जनआक्रोश ट्रॅक्टर मोर्चा मंठापासून परतुर तसेच साईबाबा मंदिरापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत काढून उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना बाजार समितीचे उपसभापती गोपाळराव बोराडे म्हणाले की, सन 2023 – 24 या आर्थिक वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी पिक विमा विमा कंपनीकडे भरला होता मात्र, खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाल्यानंतर कंपनीकडे तक्रारी करण्यात आल्या, त्यानुसार कंपनीच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष शेतात कापूस, सोयाबीन व इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून कंपनीने मंजूर विम्यातील 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात आली मात्र, उर्वरित बाकी 75 टक्के रक्कम कंपनीकडे बाकी असून ती मिळावी म्हणून वेळोवेळी कंपनीकडे मागणी करण्यात येत असली तरी कंपनी कोणताही प्रतिसाद देण्यास तयार नाही. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालवली असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा 23 सप्टेंबर पासून शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा गोपाळराव बोराडे यांनी दिला. या मोर्चानंतर गोपाळराव बोराडे यांच्यासह कल्याणराव बोराडे, प्रभूसिंग चव्हाण, प्रकाशराव सरकटे, जनार्धन राऊत, गजानन खरात, विष्णू सोनवणे, भागवत मुर्तुडकर,गणेशराव बोराडे, युवा नेते सचिन गोपाळराव बोराडे, शिवाजीराव भोसले, शिवाजीराव सोळंके, शिवाजीराव साकळे, प्रतापराव तोर, मदनराव खुळे, कल्याणराव देशमुख, सोनाजीराव बोराडे, युवराज वायाळ, अंकुशराव वायाळ, बळीराम राठोड, बाळू वायाळ, चैतन्य कोल्हे, शिवेंद्र पाटणकर, राजेभाऊ वायाळ, अशोकराव काकडे, विजय देशमुख यांच्यासह हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.