मंठा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
आगामी श्रीगणेशोत्सवासह सर्व धार्मिक उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांनी शांततेत व उत्साहाच्या वातावरणात साजरे करावेत. गणेशोत्सव काळात कुणीही सोशल मीडियावरील कुठलीही चुकीची पोस्ट टाकू नये. कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या, शिवाय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती बसविलेल्या ठिकाणी कायम एक व्यक्ती उपस्थित ठेवणे बंधनकारक आहे असे आवाहन मंठा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी केले. मंठा शहरात पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे होते यांनी यावेळी आपले मत मांडताना म्हणाले की मंठा शहरात सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. देशात कोठे काहीही झाले तरी या शहरात सामाजिक सलोखा कायम असतो. असाच सलोखा पुढेही कायम ठेवा असे मत माडले. तर यावेळी मंठा नायक तहसीलदार शिंदे साहेब, मंठा नगरपंचायतचे ओ एस अन्सारी साहेब , चौरे साहेब,
सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती
सदस्य, मंठा नगरपंचायतचे नगरसेवक, अचित नाना बोराडे, अरूण भाऊ वाघमारे, दिपक भाऊ बोराडे, शिवसेना तालुकाप्रमुख उदय दादा बोराडे, प्रकाश अण्णा घुले, समाज सेवक अशोक नाना वायाळ ,अलीम भाई कुरेशी,शबाब भाई कुरेशी, मुस्तफा पठाण, पप्पु दायमा,कयुम कुरेशी,मुसा सेठ कुरेशी, लक्षण दादा बोराडे,सुशिल बोराडे, रवी बोराडे, मंठा पोलिस उपनिरीक्षक कैलाश भारती,उप निरीक्षक संतोष माळगे, सतिश आमटे साहेब, आनंद ढवळे साहेब, बनकर साहेब , पत्रकार संतोष दायमा, नागेश कुलकर्णी, रंजित दादा बोराडे,आतुल खरात अनिल खंदारे, पोलिस पाटील डोईफोडे साहेब, गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य,
पदाधिकारी, मंठा शहरा सह तालुक्यातील नागरीक याची मोठ्या संख्येने उपस्थिती
होती.
Users Today : 135