बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये शिक्षक दिन व चक्रधर स्वामींचा अवतार दिन साजरा

Khozmaster
2 Min Read

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून देऊन आपलं कर्तुत्व सिद्ध कराव असं आवाहन  जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत त्यांनी व्यक्त केला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून तसेच महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की शिक्षक हे ज्ञानदानाचे कार्य करतात पण  विद्यार्थ्यांनी ते ग्रहण करून आत्मसात केल.  तरच ते ज्ञान सार्थकी लागतं तेव्हा विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये असताना ज्ञानग्रहण करून त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करावा असे ही ते म्हणाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मॉडेल कॉलेजचे मानदसंचालक अण्णासाहेब म्हळसणे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. पी. डी. सपकाळ, श्री. कानडजे, शाहीना पठाण, किं. वा. वाघ यांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. या सत्कारमूर्तींनी सुद्धा सत्काराला उत्तर देताना विद्यार्थिनी विद्यार्थी दहशत करावयाच्या अभ्यासाबद्दल  मार्गदर्शन केलं.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दीपक भिसे यांनी केलं तर महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या जीवन चरित्राबद्दल प्रा महंत यांनी विचार मांडून मार्गदर्शन केलं. चक्रधर स्वामींच्या  समता मानवता अहिंसा ममता सर्वधर्म समभाव स्त्री पुरुष समानता हेचक्रधर स्वामींचे विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर कथन केले. या कार्यक्रमाला मॉडेल डिग्री कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 9 4 9 6 3
Users Today : 135
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *