लोणार शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. समाजकार्याची त्यांना मुळातच आवड असल्यामुळे ते नेहमी च शेतकरी कष्टकरी यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात व सरकार दरबारी समस्या मांडून त्यांना मदत नेहमी ते मिळवून देत असतात. लोणार तालुक्यातील विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांच्या संकल्पनेतून जनता दरबार आज पासून शिक्षक दिनाच्या शुभ मुहूर्तावर दर गुरुवारी सुरू करण्यात आला. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत श्री टॉकीज लोणार या ठिकाणी जनता दरबार भरवण्यात आला तसेच दर गुरुवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडविण्यात येणार आहेत. आज झालेल्या जनता दरबाराला नंदू भाऊ मापारी भगवानराव कोकाटे सुधाकर भाऊ मापारी अशोक भाऊ वारे विनायक मापारी अरुण गीते पांडुरंग मुंडे सह तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती आणि या माध्यमातून जनतेचा सकर्मक प्रतिसाद मिळाला व जनतेच्या समस्या सोडविण्यात आल्या
Users Today : 135