मंठा नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर.

Khozmaster
1 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा 

शुक्रवार, ६ सप्टेंबरपासून मंठा नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर गेले असल्याने जन सामन्यांची मात्र कामे खोळंबली आहेत. शासनाकडे दिलेल्या विविध निवेदना नुसार शासनाने दखल न घेतल्याने शासनाच्या विरोधात निषेध म्हणून संवर्ग अधिकारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, साफसफाई यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी संपावर गेले आहेत. शासनाकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
जुनी पेन्शन योजना लागू करून तात्काळ अंमलबजावर्णी करण्यात यावी, नगरपंचायत कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, आगाऊ वेतन अनुदान एक महिना अगोदर देण्यात यावे, न.प. राज्यसंवर्ग अधिकारी हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांना तात्काळ सेवार्थ आयडी देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी मंठा नगर पंचायत विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शुक्रवार रोजी मंठा नगरपंचायत कार्यालया समोर बसून आंदोलन चालू केले.
0 9 4 9 6 6
Users Today : 138
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *