Khozmaster
2 Min Read
शिरपूर येथे  वृध्द आदीवासी दाम्पत्याच्या  हत्यने तळणी परीसरात एकच खळबळ …
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
 मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील शिरपूर हे गाव तळणी येथून अवघ्या सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या शिरपूर येथील मुंगसाजीनगर येथील आदीवासी वस्तीत प्राथमीक शाळा परीसरातील वृध्द दाम्पत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली असुन त्यांची नावे धोडीबा कान्होजी कोकाटे ( वय  ८० ) व वच्छला कान्होजी कोकाटे वय (७४) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत प्राथमीक पाहणीतून ही घटना चार ते पाच दिवसापूर्वी घडल्याचा अंदाज आहे
ही घटना आज दि 8 सप्टेबर रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान उजेडात आली असुन वृध्द दाम्पत्याचा एक मूलगा गावातच राहत असल्याने तीन चार दिवसापासून आईची चक्कर आपल्या घरी का झाली नाही? पत्नीला बघण्यासाठी पाठवले तर घराला बाहेरून कुलूप दिसले आणि  घरातून खूप दुंर्गधी येत असल्याचे निदर्शनास आले . ही माहीती गावातील पूढाऱ्यांनी मंठा पोलीसांकडे दिल्यानंतर मंठा पोलीस निरीक्षक रविद्र निकाळजे घटनास्थळावर दाखल झाले . दाम्पत्याच्या खोलीवरील टीनपञे बाजुला केल्यानंतर दोनही वृध्द मृतावस्थेत दिसून आले. दोनही वृध्दाच्या मानेवर व डोक्यावर जखमा असलेल्या अवस्थेमध्ये दिसून आल्याचे प्रत्यक्ष्य दर्शीने सांगीतले. बाहेरून कोनी बघू नये म्हणून  खोलीच्या खिडक्यांना आत मधुन कपड्यानी पूर्णपणे पॅंक करण्यात आले होते . शाळेच्या संरक्षक भितीच्या जवळच कोकाटे दाम्पत्य वास्तव्यास राहत होते दोन हजार लोकसंख्या असलेले शिरपूर गावात आदीवासी समाजाची ६० ते सत्तर कुटुंब  गावापासुन पाचशे मिटरच्या अंतरावर एका वस्तीत एकोप्याने राहतात मात्र ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.असुन गावात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे…
यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक आयुष्य नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी चौरे,मंठा पोलीस निरीक्षक निकाळजे, उपनिरीक्षक भारती, उपनिरीक्षक माळगे,पोलीस जमादार मुंढे, अंमलदार मनोज काळे,सचिन जाधव, आकाश राऊत, ब्रम्हानंद डोईफोडे, सतीष आमटे, पांडुरंग हागवने यांची उपस्थिती होती…
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलाश भारती हे करीत आहेत…
0 9 4 9 6 6
Users Today : 138
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *