लायन्स क्लबच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा – तालुक्यातील केंधळी येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये लायन्स क्लब ऑफ जालना आणि परतूर यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या मोफत नेत्र तपासणी करीता शिबिराचे आयोजन करण्यात आले.हे शिबीर शुक्रवार ( दि.६ रोजी) शाळेच्या आवारात आयोजीत करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये जवळपास २५० विद्यार्थ्यांची समग्रनेत्रतपासणी करण्यात आली व आवश्यकतेप्रमाणे त्यांना चस्म्याचे नंबर आणि इतर उपचार देण्यात आले.विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांच्या डोळ्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली.शिबीरामध्ये लायन्स क्लबचे नेत्रविकारतज्ञ शेख मुस्ताख,आदेश दांडगे,टेक्निशियन योगेश निकाळजे, प्रकाश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. यावेळी शाळेच्या व्यवस्थापन समितीने लायन्स क्लबचे आभार मानले.
Users Today : 138